नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!लहान मुलांसमोर कुठलीही गोष्ट बोलताना काळजी घ्या मुलांसमोर कधीही एकमेकांसोबत भांडू नका मुलांसोबत खोटे बोलू नका किंवा दिखावा करू नका नितीशास्त्रात आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे भलेही लोकांना कठोर वाटत असली तरी लोकांचे जीवन सुकर करण्याचा योग्य मार्ग दाखवते. या उपायांचा अवलंब केल्याने कोणतीही व्यक्ती आपले जीवन आनंदी बनवू शकते.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितीशास्त्रात वृद्ध, वयाने मोठे आणि महिला तसेच लहान मुलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मुलांच्या संगोपनाशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टींबाबत पालकांना सावध करत आचार्यांनी सांगितले की, पालकांनी मुलांसमोर प्रत्येक गोष्ट नीट विचार करूनच करावी. कारण मुले लहान रोपांसारखी असतात. ते लहानपणी त्यांच्यावर जसे संस्कार होतील त्याच प्रकारे ते मोठे होतील. त्यामुळे मुलांची काळजी घेताना अनेक खबरदारी घेणे आवश्यक आहे. जर पालकांनी या गोष्टींची काळजी घेतली नाही तर भविष्यात त्याचा परिणाम मुलांवर होऊ शकतो.

मुलांसमोर खोटे बोलू नका
आचार्य चाणक्य यांच्या मते, पालकांनी कधीही मुलांसमोर खोटे बोलू नये किंवा त्यांच्यासमोर दिखावा करू नये. जर एखाद्या पालकाने असे केले तर ते मुलांना त्यांच्या खोटेपणात समाविष्ट करुन खोटे बोलायला शिकवतात. असे केल्याने त्याचा त्रास पालकांनाच सहन करावा लागतो कारण, भविष्यात मुलेच त्यांच्यासोबत खोटे बोलू लागतात.

सन्मान आणि आदर
आचार्य चाणक्य म्हणतात की, पालकांनी आपल्या मुलांसमोर एकमेकांचा आदर आणि सन्मान करायला पाहिजे. कारण, त्याचा थेट परिणाम मुलांच्या मनावर होतो. मुलंसमोर एकमेकांचा अनादर केला तर मुलंही तेच शिकतात आणि आई-वडिलांचा आदर करणंही सोडून देतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *