नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! आपण या जगामध्ये नेहमी बघत असतो की, काही महिला लग्नानंतर आपल्या नवऱ्यापासून काही गोष्टी लपवून ठेवत असतात आणि जेंव्हा त्या गोष्टी इतर लोकांकडून नवऱ्याला समजतात तेंव्हा त्या दोघांमध्ये कलह निर्माण व्ह्यायला सुरुवात होत असते.

मित्रांनो साधारणपणे बायकोने आपल्या नवऱ्यापासून कोणत्याही गोष्टी लपवून ठेवायला नकोत. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबाबत सांगणार आहोत ज्या एका बायकोने कधीही आपल्या नवऱ्यापासून लपवून ठेवायला नकोत.

तर मित्रांनो यातील पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे, त्यांचे पूर्वीचे प्रेम संबंध, अशी बाब कधीही लपवून ठेवू नये. लग्नानंतर आपलं एखादं जुनं प्रेम प्रकरण कधीही आपल्या नवऱ्यापासून लपवून ठेवाला नकोत. तसेच या गोष्टींची उकल शक्यतोवर लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याला सांगितलेलं केव्हाही बरं, जेणेकरून यामुळे भविष्यात त्यांच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी तयार होणार नाहीत.

जर कधी तुमच्या पूर्व जीवनातील किंवा कॉलेज लाईफ मधिल प्रेम प्रकरणाबद्दल तुमच्या नवऱ्याला इतर कुणाकडून समजले तर त्या गोष्टीचा त्याला राग येऊन तो या गोष्टीचा बाऊ करु शकतो. तसेच तुमच्यामध्ये भांडणही होऊ शकतात.

त्याचबरोबर तुम्ही जर एखाद्या ठिकाणी नोकरी करीत असाल तर तुमच्या सहकारी पुरुषांची ओळख आपल्या यजमानांना करून द्यायला पाहिजे. त्याचबरोबर जर ज्या शहरात तुम्ही राहतात त्या शहरात इतर कुणी जुना मित्र राहत असेल तर त्याबद्दलही आपल्या नवऱ्याला कल्पना दिलेली योग्यच ठरेल.

जर तुमच्या पतीदेवांना तुम्ही कधी अचानक त्या मित्रांसोबत बाहेर कुठे दिसलात तर होणारा वाद टाळता येऊ शकतो. म्हणूनच महिलांनी नेहमी आपल्या पुरुष मित्रांची कल्पना आणि नियमित संपर्कात असणाऱ्या ऑफिसमधील सहकाऱ्यांचीही ओळख यजमानांसोबत नक्कीच करून द्यायला हवी.

एखाद्या आर्थिक व्यवहाराबाबतची माहिती कधीही महिलांनी आपल्या यजमानांपासून लपवून ठेवायला नको. बऱ्याचदा महिलांना यजमानांच्या नकळत इतरांकडून हात उसने पैसे घेण्याची सवय असते. तसे पैसे घेऊन त्या ते पैसे खर्चही करुन टाकतात.

पण मित्रांनो नेमके जेंव्हा पैसे परत करण्याची वेळ येते तेंव्हा त्या महिलेकडे पैसे नसतात. मग नंतर हे प्रकरण जेंव्हा यजमानांना समजते तेंव्हा त्या दोघांमध्ये भांडणं व्हायला सुरुवात होत असते. म्हणूनच महिलांनी अशा पैश्यांच्या व्यवहारा बद्द्ल यजमानां पासून कधीही लपवून ठेवायला नको.

महिलांनी त्यांच्या मा सि क पा ळी बाबत किंवा त्यांच्या पा ळी च्या तारखां बद्दल आपल्या यजमानांपासून काहीच लपवून ठेवू नये. एकंदर पतीदेव किंवा यजमान हे आपल्या बायकोला त्यांच्या ‘त्या’ दिवसांत होणाऱ्या सर्व त्रासामध्ये मदत करत असतात.

अगदी निःसंकोचपणे ते पत्नीच्या कामांत मदत करत असतात. काही पुरुषमंडळी स्त्रियांना त्या दिवसांमध्ये घरातील जेवणही ते स्वतःच बनवत असतात. त्याचमुळे महिलांनी स्वतःला त्रास न करून घेता त्यांच्या ‘त्या’ दिवसांची किंवा तारखांची योग्य ती माहिती आपल्या यजमानांना द्यायलाच हवी.

त्याचबरोबर तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला कुणाचा त्रास होत असेल किंवा तुमची कुणी छेड काढत असेल, तर अशा गंभीर बाबी लपवून ठेवायला नकोत. बऱ्याचदा महिलांचे असे म्हणणे असते किंवा असा समज असतो की, हा पुरूष माझी छेड काढतोय ही गोष्ट जर मी माझ्या घरच्यांना सांगून दिली किंवा या गोष्टीबाबतची वाच्यता बाहेर कुठे झाली तर, लोक त्यांनाच नाव ठेवतील, त्यांचीच बदनामी होईल. तसेच नोकरी सोडण्यासाठी घरातून सांगितले जाईल, असे त्यांना वाटत राहते. तर तुम्ही या सर्व गोष्टी तुमच्या यजमानांना विश्वासात घेऊन सांगायला हव्यात.

50% महिलांचा हा अनुभव असतो, त्यांचा बॉस त्यांना ऑफिसच्या केबिनमध्ये बोलवून छेडत असतो. आणि त्यांनी या गोष्टीची वाच्यता बाहेर कुठे केली तर नोकरीवरून काढून टाकण्यासाठी ध म की देण्यात येते. आणि मित्रांनो खास करुन महिलांनी एक लक्षात असू द्यावे की त्यांच्या नोकरीपेक्षा त्यांचं शीलं किंवा चा रि त्र्य जास्त महत्त्वाचे आहे.

त्यामुळे या गोष्टी सुद्धा यजमानांपासून लपवून न ठेवता त्यांना किंवा ऑफिसच्या एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला याबाबत कल्पना द्यावी. हेच सर्व कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींसोबतही घडत असते. काही मुलं मुलींची छेड काढत असतात परंतु घरचे लोक त्यांचं कॉलेज बंद करतील या भीतीपोटी त्या घरामध्ये सांगत नसतात. तर महिलांनो आणि मुलींनो या गोष्टी कधीही लपवून न ठेवता घरच्या लोकांना किंवा जवळच्या एखाद्या विश्वासार्ह व्यक्तींच्या कानावर टाकायला पाहिजेत..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *