नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!चाणक्य निती आजच्या काळातही महत्त्वाची आणि उपयुक्त आहे. कारण चाणक्य नितीमध्ये जगावे कसे, सार्वजनिक जीवनात वर्तन कसे असावे याविषयी मार्गदर्शन आहे आणि हे मार्गदर्शन आजही उपयुक्त आहे. एवढी शतके लोटली तरी आचार्य चाणक्य यांचे विचार आजही कालातीत आहेत.

चाणक्य सांगतात जीवनात यशस्वी होण्यासाठी, संपत्ती मिळविण्यासाठी, समाजाकडून मानसन्मान मिळविण्यासाठी काही चुका टाळणे आवश्यक आहे. हा विचार आजही प्रेरणादायी आणि उपयुक्त असल्याचे अनेकजण सांगतात.

आचार्य चाणक्य यांच्या म्हणणण्यानुसार जी व्यक्ती अवगुणमुक्त असते ती व्यक्ती आनंदी असते. राग, लोभ, मत्सर, फसविणे, खोटो बोलणे, दुसऱ्यांचा अपमान करणे, दुसऱ्याला कमी लेखणे हे अवगुण आहेत. या अवगुणांपासून मुक्त असलेली व्यक्ती आनंदी असते.

अवगुण जोपासणाऱ्याकडे दीर्घकाळ संपत्ती आणि सन्मान राहू शकत नाही. याउलट अवगुणांपासून दूर असलेल्याकडे संपत्ती आणि सन्मान असतो असे आचर्य चाणक्य सांगतात. जे पद आणि प्रतिष्ठेचा गैरवापर करतात कमकुवत लोकांवर अन्याय करतात त्यांच्याकडेही दीर्घकाळ संपत्ती आणि सन्मान राहू शकत नाही असे आचार्य चाणक्य सांगतात. प्रत्येकाने संपत्ती आणि सन्मान हवा असल्यास न्याय्य वर्तन करावे, असे आचार्य चाणक्य सांगतात.

लोभ माणसाचा नाश करतो. लोभामुळे कितीही मिळवले तरी लालसा संपत नाही. माणूस थांबत नाही. त्याला समाधान लाभत नाही. सततचा लोभ माणसातील अवगुणांची तीव्रता वाढवितो. विना परिश्रम मिळालेले धन लोभ वाढविते आणि हा लोभ कधीही कितीही लाभ झाला तरी समाधान मिळवून देत नाही. यामुळे लोभापासून दूर राहण्याचा सल्ला चाणक्या देतात.

अधर्माचे पालन करणारे अवगुण जोपासणारे यांच्यापासून दूर राहावे. तसे केल्याने संपत्ती आणि सन्मान लाभतो. संपत्ती आणि सन्मान मिळण्याइतकेच ते कायम आपल्याकडे राहणे आणि त्याची वृद्धी होणे महत्त्वाचे आहे. यासाठीच न्यायप्रिय राहावे. अवगुणांपासून दूर राहावे, सद्गुणी आणि सद्वर्तनी लोकांना साथ द्यावी पण दुर्गणी आणि दुर्वर्तनी लोकांची साथ सोडावी नाही तर लक्ष्मी नाराज होते असे चाणक्य सांगतात.

गरजूंना आणि अडचणीत सापडलेल्यांना मदत करणे, अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करणे महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. जे गरजूंना आणि अडचणीत सापडलेल्यांना मदत करतात त्यांना संपत्ती आणि सन्मान मिळतो असे चाणक्य सांगतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *