नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..! लग्न हे विश्वासाचे बंधन आहे. मग भले लग्न कोणत्याही चाली रीतीनुसार का झालेले असेना, तरी लग्नावेळी एक सल्ला प्रत्येक पती पत्नीला दिला जातो की त्यांनी एकमेकांशी नेहमी खरे बोलावे आणि संसाराला प्राधान्य द्यावे. सोबतच त्या दोघांनाही एकमेकांन वचने द्यायला लावतात जेणेकरून संसार पारदर्शी होईल. पण खरंच प्रत्येक बाबतीत हे लागू होते का? तुम्हाला विश्वास बसणार नाही पण अशा काही गोष्टी असतात ज्या पत्नीने आपल्या पतीपासून लपवून ठेवलेल्या उत्तम असतात. संसाराचे आणि आयुष्याचे सार सांगणाऱ्या चाणक्यांनीच ही गोष्ट चाणक्य नीतीमध्ये सांगितलेली आहे.

त्यांनी त्यांच्या चाणक्य नीती मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी आणि दीर्घकाळ चालण्यासाठी पती-पत्नीने काही गोष्टी केवळ स्वतःच्या मनातच गुपित म्हणून ठेवल्या पाहिजेत. आज या लेखात चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या त्या 5 गोष्टीआम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्या पत्नीने कधीही नव-याला सांगू नये.

माहेरच्या गोष्टी
संसार सुरू होताच, एक स्त्री तिच्या जोडीदारावर खूप विश्वास ठेवू लागते. अशा परिस्थितीत अनेक वेळा ती तिच्या घरातील लोकांची गुपिते पतीसमोर बिनधास्त उघड करते. पण मुळात असे करू नये. कारण यावरून पतीला समजते की, तुम्ही कोणतेही सिक्रेट लपवून ठेवू शकत नाही, ज्यामुळे तो स्वतःच त्याच्या मनातील गोष्टी तुम्हाला सांगण्यास कचरतो. शिवाय अनेक पती असेही असतात, जे तुमच्याविरुद्ध तुमच्या माहेरच्या लोकांच्या सिक्रेट्सचा वापर करू शकतात. ज्यामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.

बचत केलेला पैसा
पत्नीने तिने स्वत: कमावलेल्या किंवा पतीच्या कमावलेल्या पैशातील एक छोटासा भाग नेहमी बचत म्हणून ठेवावा. जेणेकरून संकटाच्या वेळी कुटुंबाला मदत करता येईल. अशा परिस्थितीत नवऱ्यालाही या बचतीची जाणीव नसावी, हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. कारण पतीला याची माहिती मिळाल्यास तो या पैशाचा वापर कोणत्याही किरकोळ कामासाठी करू शकतो.

केलेले दान
वेदांमध्ये लिहिले आहे की, एका हाताने केलेल्या दानाची गोष्ट दुसऱ्या हाताला कळू नये, तरच त्याचा लाभ होतो. म्हणूनच आचार्य चाणक्य स्त्रियांना सावध करतात आणि त्यांना सल्ला देतात की त्यांनी चुकूनही जर कुठे दान केले असेल तर त्याची माहिती आपल्या पतीला देऊ नये. अन्यथा त्याचा लाभ कमी होईल. यासोबतच पती-पत्नीमध्ये खर्चाबाबतही भांडण होऊ शकते, ज्यामुळे दानाचे महत्त्व पूर्णपणे नष्ट होते.

भूतकाळातील अफेअर्स
नवरा कितीही समजूतदार आणि सपोर्ट करणारा असला तरीही तुमच्या भूतकाळावर तो कसा रिअॅक्ट करेल अन् कितपत मनापासून स्वीकारून तुमच्यावर प्रेम करेल याची काहीच गॅरेंटी नसते. काही लोक सांगताना समजून घेतात पण भांडणं किंवा चिडचिड झाली की भूतकाळातील मागे पडलेल्या गोष्टी किंवा प्रेमप्रकरणांवरून थेट चारित्र्यावर बोट उचलतात. अर्थात वर्तमानात प्रामाणिक असलेल्या कोणत्याच पत्नीला हे सहन होणार नाही अन् यातून नात्याचा अंत होऊ शकतो. म्हणून कितीही वाटलं तरी पास्ट अफेअर्सबाबत नव-याला न सांगणंच उत्तम..!

मनातील जळकेपणा
हल्लीचे जग स्मार्टफोन अन् मॉर्डन नात्यांचे आहे. हल्ली लग्न झालेली अन् न झालेली सर्वच मुलं-मुली खुलेआम मैत्रीच्या नावाखाली चॅटिंग, गळाभेट अशा गोष्टी करतात. पण जोवर पार्टनरला त्याची मर्यादा माहित आहे तोपर्यंत त्याच्यावर घेतलेला संशय हा आपल्या मनातील जळकेपणा आहे हेच सत्य असतं. त्याने पायरी ओलांडली तर त्याला जाब विचारणं योग्य आहे पण त्याआधी संशय घेत राहणं, जाब विचारणं या गोष्टी केल्यास तो मानसिकरित्या तुमच्यापासून दुरावला जाऊ शकतो. त्यामुळे तो मुलींशी बोलतो याच्याशी तुम्हाला प्रॉब्लेम आहे हे त्याला कधीच सांगू नका.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *