नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!तुम्ही तुमचा डोळा कोणत्या न कोणत्यातरी कारणांमुळे कधीतरी फडफडला असेलच. तर मित्रांनो आज आपण हेच जाणून घेणार आहोत की स्त्री असो किंवा पुरुष असो यापैकी जर कुणाचाही उजवा डोळा असो किंवा डावा डोळा असो हा फडफडल्यानंतर याचे कोणते अर्थ निघतात. किंवा यामागचे शुभ किंवा अशुभ संकेत कोणते.?

मित्रांनो या बाबतीत सामुद्रिक शास्त्रांमध्ये अगदी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या पण काही घटना घडणार आहेत. मग त्या घटना शुभ असतील की अशुभ असतील याचे पूर्व संकेत देण्याचे काम हे आपले विशिष्ट प्रकारे डोळे फडफडणे ही क्रिया यातून देत असते. मित्रांनो आपण बऱ्याच लोकांच्या तोंडून हे वाक्य ऐकलं असेल की माझं हे अंग माझा हा अवयव फडफडत होता.

तर हे डोळ्यांचे फडफडने शुभ आहे की अशुभ आहे. मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार तसेच वास्तुशास्त्रानुसार डोळ्यांच असं फडफडण हे भविष्यामध्ये होणाऱ्या घटनांची आपल्याला पूर्वसूचना देत असतं. शरीराची जवळ जवळ सर्वच्या सर्व अंग फडफडत असतात आणि त्या प्रत्येकाचा काहीना काहीतरी विशिष्ट असा अर्थ असतो काही गोष्टी शुभ होणार आहेत याकडे संकेत करतात.

तर काही गोष्टी मात्र भविष्यामध्ये आपल्या वरती मोठं संकट आहे हे आपल्याला सांगत असतात. मित्रांनो चला तर पाहूया आपला जो उजवा डोळा फडफडत असेल किंवा आपल्या उजव्या डोळ्याची जी पापणी आहे किंवा उजव्या डोळ्याची जी भुवई आहे फडफडत असेल तर हे शुभ असत की अशुभ असत. मित्रांनो सामुद्रिक शास्त्र असं मानत की पुरुषांमध्ये जर त्यांचा उजवा डोळा फडफडत असेल किंवा उजव्या डोळ्याची पापणी फडफडत असेल.

ज्याला आपण होळी म्हणतो ती जर फडफडत असेल हे अत्यंत शुभ समजलं जातं आणि भविष्यामध्ये अशा पुरुषांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. त्यांची अडलेली कामे होऊ शकतात प्रमोशन्स होऊ शकतात. किंवा मोठा धनलाभ मोठा प्रमाणात पैसा सुद्धा या लोकांकडे येण्याचे चान्सेस असू शकतात. परंतु मित्रांनो हीच गोष्ट जर स्त्रियांच्या बाबतीत होत असेल.

महिलांच्या बाबतीत जर हे होत असेल की महिलांचा जर उजवा डोळा फडफडत असेल तेव्हा मित्रांनो उजवीजी पापणी आहे किंवा उजव्या बाजूची जी भुवई आहे ती जर फडफडत असेल महिलांसाठी मात्र हे अंत्यत अशुभ अशा प्रकारची घटना असते. आणि भविष्यामध्ये त्यांच्याबाबतीत काहीतरी अशुभ प्रकारचे फळ आपल्याला मिळणार आहे याकडे ही गोष्ट संकेत करते.

मित्रांनो आता आपण पाहुया की आपला जो डावा डोळा आहे डावाडोळा जर फडफडत असेल किंवा डाव्या बाजूची पापणी डाव्या बाजूची भुवई फडफडत असेल तर त्याचे स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत काय संकेत आहेत. पुरुषांच्या बाबतीत जर डावा डोळा फडफडत असेल तर मित्रांनो त्यामुळे या पुरुषांना भविष्यामध्ये मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं.

तसेच एखाद्या शत्रूबरोबर शत्रुत्व वाढू शकत किंवा दुश्मनीचं, शत्रुत्वाच वातावरण भविष्यामध्ये निर्माण होऊ शकत म्हणून आपण आपल्या वर्तनावर आपल्या वागण्यावरती ताबा ठेवायला हवा. मित्रांनो हीच गोष्ट जर आपण स्त्रियांच्याबाबतीत पहिली तर मित्रांनो स्त्रियांचा डावा डोळा डावी पापणी किंवा डावी भुवई जर फडफडत असेल तर ह्याचा अर्थ अशा स्त्रियांना भविष्यामध्ये मोठा लाभ होण्याची शक्यता असते.

त्यांना कोणता तरी फायदा कोणत्या ना कोणत्यातरी स्वरूपात नक्की होणार आहे. याकडे ही गोष्ट पूर्वसंकेत देत आहे. तर मित्रांनो डोळे फडकण्याच्या संबंधित माहिती तुम्हाला सांगितली ही सर्व माहिती सामुद्रिक शास्त्रावर आधारित आहे मित्रांनो वास्तुशास्त्र आणि ज्योतिष शास्त्रावर हे अनेक उपाय आम्ही सांगितले.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *