नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!!मंगळवारी ज्या ग्रहाचा प्रभाव असतो तो म्हणजे मंगळ. मंगळवार हा दिवस भगवान हनुमंताला समर्पित आहे. या मंगळवारी मोठ्या भक्तीभावाने लोक हनुमानाची पूजा करतात. सायंंकाळी हनुमानाच्या देवळात दिवा प्रज्वलित करतात. त्यांना भक्तीभावाने लवंगा अर्पण करतात.

अशी मान्यता आहे की मंगळवारी या दिवशी हनुमंताची विशेष पूजा केल्याने, आपल्या जीवनात जी काही बाधा आहे, नजरदोष, घरातील आजारपण यापासून मुक्ती मिळते. मोठ्यात मोठी संकटे दूर होतात. मंगळवारी मंगळ ग्रहाचा प्रचंड प्रभाव असतो. म्हणून या मंगळवारी काही कामे कटाक्षाने टाळावीत.

तर काही अत्यंत शुभकामे यावेळी केल्यास त्याचा लाभ नक्की होतो. तर मित्रांनो, जाणून घेऊया मंगळवारी आपण कोणती शुभ कामे करावीत, आणि कोणत्या वस्तू या दिवशी खरेदी करू नयेत.

जमीन : अनेक कामासाठी मंगळवार हा वार शुभ मानला जातो. परंतु या वारा दिवशी कधीही जमीन खरेदी केली जाऊ नये. कारण मंगळवार भूमिपूजेच्या दृष्टीने अशुभ मानला जातो. तसेच, आपण मंगळवारी दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नका किंवा घेऊ नका. हे उधार दिलेले पैसे बुडण्याची शक्यता असते.
ज्या व्यक्तीला आपण पैसे उधार देतो ती व्यक्ती पैसे परत करण्यास टाळाटाळ करते. सोबतच एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर कर्ज देणार असाल, तर ते कर्जदेखील मंगळवारी देऊ नका. ते कर्ज देणे मंगळवारी या दिवशी अशुभ मानले जाते. कर्ज घेणारा कर्जाची परतफेड करत नाही.

याउलट तुमच्या डोक्यावर जर कर्ज असेल, तर त्या कर्जाचे हप्ते मंगळवारी या दिवशी भरा. खूप लवकर तुमचे कर्ज फिटेल. हिंदूशास्त्राप्रमाणे, पुरुषांनी मंगळवारी या दिवशी दाढी करू नये.

उडीद डाळ : मंगळवार या दिवशी आपण उडीद डाळीचे देखील सेवन करू नये किंवा खरेदी करू नये. उडदाच्या डाळीचे सेवन मंगळवारी केल्याने, शनि आणि मंगळ यांचा संयोग होतो. आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, आपल्या तब्येतीवर होतो. तसेच कर्जबाजारी होण्याची शक्यता असते.
आपल्या घरामध्ये गरीबीदेखील येऊ शकते. ज्या घरातील लोक वारंवार आजारी पडतात. घरात बाधा आहे अशा लोकांनी मंगळवारी उडदाची डाळी सेवन करणे हे कटाक्षाने टाळा. त्याचप्रमाणे, मंगळवार या दिवशी दाढी केल्याने मंगलदोष लागतात. कारण हा दिवस दाढी करण्यासाठी अशुभ मानला जातो.

महिलांनी शृंगारचे साहित्य मंगळवारी या दिवशी खरेदी करू नये. कारण हे साहित्य खरेदी केल्यामुळे वैवाहिक जीवनात अनेक बाधा उत्पन्न करते. पतीपत्नीमध्ये एकमेकांमध्ये द्वेष निर्माण होतो. शृंगारचे साहित्य खरेदी करण्यासाठी शुक्रवार हा दिवस अतिशय शुभ आहे. किंवा सोमवार या दिवशी देखील खरेदी करू शकता.

त्यामुळे पतीपत्नीच्या प्रेमामध्ये वाढ होते. असे धर्म शास्त्रात उल्लेखित आहे. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये मंगलदोष आहे, मुख्यत्वेकरून शनीदोष आहे. अशा लोकांनी मंगळवार या दिवशी मांसाहार करू नका. ते कटाक्षाने टाळा. कोणतेही प्रकारचे व्यसन करू नका.

असे लोक जर मंगळवार या दिवशी मांसाहार करतात तर त्याचा स्वभाव उग्र बनतो. असे लोक नकारात्मक बोलतात आणि त्यांचा नकारात्मक स्वभाव कुटुंबावर आणि एकंदर सामजिक जीवनावर परिणाम करतो.

काळ्या रंगाचे कपडे आणि काचेची भांडी : मंगळवार या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे हे अशुभ मानले जाते. मंगळवारचे लाभ प्राप्त करण्यासाठी, मंगल ग्रहाची कृपा प्राप्त करण्यासाठी, आपण लाल रंगाचे कपडे परिधान करू शकता.
त्यामुळे आपणास शुभ लाभ प्राप्त होतात. कोणत्याही कामात यश मिळते. मित्रांनो जर तुम्ही काचेची भांडी मंगळवार या दिवशी खरेदी करत असाल, तर ती खरेदी करू नका. मंगळवारी कोणतीही काचेची वस्तू खरेदी केल्याने, पैशांमध्ये नुकसान होते.तसेच, आपल्यापेक्षा मोठ्यासोबत वादविवाद करू नका.

भांडणे करून नका या दिवशी. त्यामुळे आपल्या सोबत वाईट दुर्घटना घडते. मित्रांनो तुम्ही जर एखादा प्रवास करत असाल. आणि तो प्रवास वायव्य दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा या दिशांना असेल, तर तो मंगळवार या दिवशी कितीही महत्वाचा असेल प्रवास, तरी करू नका. विशेषकरून उत्तर दिशेला मंगळवारी दिशाशूल असतो.

जर महत्वाचं कार्य असेल आणि जावेच लागत असेल, तर थोडासा घरातून गुळ आपल्या सोबत घेऊन जावा. आणि घरातून निघताना थोडा गुळ तोंडात टाका. म्हणजे विघ्न दूर होतील. मंगळवारी या दिवशी रात्री हनुमंताच्या देवळात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि दोन साबूत लवंगा हनुमंताच्या चरणी अर्पण करा.

यामुळे शुभ लाभ प्राप्त होतात. नैवेद्य म्हणून कोणताही प्रसाद त्या ठिकाणी ठेवा आणि 11 वेळा हनुमानचालीसाचा पाठ करा. यासोबतच हनुमंताची आरती म्हणावी. या उपायाने आपल्या जीवनातील मोठ्यातमोठ्या बाधा, नजरदोष, घरात कोणाला नजर लागली असेल, तर ते सर्व दोष हनुमंताच्या कृपेने दूर करता येतात..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *