नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! एक असं रसायन आहे जे चमत्कार घडवू शकते. गेल्या दोन शतकात आणि विशेषतः: स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षात जाणीवपूर्वक षंढ बनविलेल्या सनातनी हिंदूंना पुन्हा क्षात्रतेजाच्या दिशेने घेऊन जात आहे. भारत हिंदू राष्ट्र बनवण्याची प्रेरणा देतो एवढेच नाही तर सध्या अस्तित्वात असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमा न पुसता अखंड भारत ही संकल्पना (म्हणजे वैदिक तत्वज्ञानावर आधारित समाजरचना ) पुन्हा भारतीय उपखंडात रुजऊ पाहतो.

त्याचे वडील व्यसनी असल्याने कोणतेही काम करत नसत त्यामुळे विपत्तीमधून गुजराण करावी लागली असल्याचे त्याने सांगितले, असे असले तरीही वडिलांबद्दल राग, तिरस्कार दर्शविला नाही किंवा अपशब्द वापरले नाहीत. यावरून त्याच्या आईने त्याच्यावर केवढे उच्चं संस्कार केले आहेत याची प्रचिती येते. तो आईचे गुणगान नेहमी गातो, कथावाचन हा व्यवसाय असून स्वतः:ला सामान्य व्यक्ती मानतो. इतरांप्रमाणेच लग्न, संसार करणार असल्याचे प्रांजळपणे सांगतो. एका बैठकीत निराहार राहून एक लक्ष हनुमान चालीसा पाठ केल्याचा दावा करतो. आम्ही दहा पाठ करू शकत नाही तेव्हा त्याचा दावा खोटा वाटतो. पण त्याच्या बालिश, निरागस वाटणाऱ्या लीला पाहून असत्य कथन करेल असे वाटत नाही. आणि खरोखरच एक लक्ष पाठ केले असतील तर सिद्धी प्राप्त झाली असेल यात वाद नाही.

चमत्कार करत असल्याचा दावा तो स्वतः:च अमान्य करतो आणि याचे सारे श्रेय तो हनुमंताला देतो. त्यांनी चालविलेले घरवापसी अभियान पहाता उद्या आसाराम बापूप्रमाणे ट्रॅप करून बंदोबस्त केला जाण्याची दाट शक्यता याच्या बाबतीत संभवते. पण या वेळी त्याला मिळत असणारी वाढती लोकप्रियता हे त्याचे संरक्षक कवच बानू शकेल.

थोडक्यात काय तो चमत्कारी आहे किंवा नाही हे ज्याचे त्याने ठरवावे पण तो निर्मल मनाचा आणि अल्पवयात गुरुत्व लाभलेला सच्चा सनातनी आहे भोंदू बाबा म्हणावे तर धानाच्या लोभाने त्याने बाबागिरी केल्याचे कोणतेही उदाहरण नाही. निद्रिस्त सनातनी हिंदूंना नवसंजीवनी देणारा हा तरुण गुरु आपल्याला लाभला हे आपले भाग्य आहे. त्याला जपायची जबाबदारी समस्त सनातनी हिंदूंची आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *