नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!आपल्या सभोवताली काही लोक असे असतात जे खूप कष्ट करतात, आयुष्यभर खूप परिश्रम करतात, अगदी आकाश पाताळ एक करतात पण तरीसुद्धा ते कधीच श्रीमंत होत नाहीत. ते कधीच आर्थिक दृष्ट्या सबल होत नाहीत, त्यांच्या घरामध्ये कधीच पैसे येत नाहीत आणि आलेच तरीही ते पैसे टिकत नाही.

तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अशा 5 व्यक्ती ज्या कधीच श्रीमंत होत नाहीत. मित्रांनो हिंदू धर्म शास्त्रात उल्लेख आहे की या 5 व्यक्तींनी कितीही कष्ट करू द्या, ते श्रीमंत होत नाहीत. चला जाणून घेऊया कोण आहेत त्या व्यक्ती. मळकट कपडे घालणारी व्यक्ती मळकट कपडे घालणारी व्यक्ती

मळकट कळकट कपडे घालणारी व्यक्ती –
मित्रांनो पहिली व्यक्ती ती आहे जी नेहमी मळकट कपडे घालते. नेहमी मळकट कपडे घालणाऱ्या व्यक्तींच्या घरी माता लक्ष्मी कधीही वास करत नाही. जर तुमचं कामचं असं असेल जिकडे तुमचे कपडे काम करताना मळकट होत असतील तर ते मान्य आहे. कारण परिश्रम हे माता लक्ष्मी ला प्रसन्न करण्यासाठी फायदेशीर आहे.

पण कष्ट न करता आळस म्हणूज जर तुम्ही मळकट कपडे घालत असाल तर ते माता लक्ष्मी ला मान्य नाही. त्यामुळे आळशी पणाने मळकट कपडे घालून लोळत पडणाऱ्या व्यक्तींवर लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही आणि ते आयुष्यात कधीही श्रीमंत होत नाहीत.

बोलताना सतत अपशब्द बोलणारी व्यक्ती –
मित्रांनो दुसरी व्यक्ती अशी आहे जी सतत अपशब्द बोलते. ज्या व्यक्तीची वाणी कठोर आहे. जी नेहमी दुसऱ्यांना शिव्या शाप देत असते, त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कधीही कृपा करत नाही.

दुसऱ्याच मन सतत दुखवणारी व्यक्ती, दुसऱ्या बद्दल मनामध्ये वाईट भाव ठेऊन वावरणारी व्यक्ती यांच्या कडे सुद्धा लक्ष्मी पाठ फिरवते आणि ते आयुष्यात कधीही श्रीमंत होत नाहीत. चुकून अशा व्यक्तीकडे पैसा आलाच तर माता लक्ष्मी यांच्याकडे जास्त दिवस टिकत नाही.

सूर्योदय आणि सुर्यास्ता वेळी झोपून राहणारी व्यक्ती
– मित्रांनो तिसरी व्यक्ती ती आहे जी सूर्योदय किंवा सुर्यास्ता वेळी झोपून राहते. आपण ब्राह्म मुहूर्तावर उठावं असं हिंदू धर्म शास्त्र मानतं. पण ते शक्य नसल्यामुळे आपण किमान सूर्योदया पूर्वी उठावं. जो व्यक्ती सूर्योदय झाल्या नंतर उठतो त्याच्यावर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही.

जी गोष्ट सूर्योदयाची तीच गोष्ट सुर्यास्ताची. जी व्यक्ती सुर्यास्ता वेळी झोपून राहते, आळशी पणे लोळत राहते, त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाहीत.

सूर्योदय आणि सुर्यास्त ही वेळ माता लक्ष्मी च्या आगमनाची वेळ असते. त्यामुळे या वेळी आळस झटकून टाकावा. या दोन वेळा अत्यंत प्रसन्न असतात. या दोन वेळेला केलेलं काम नेहमी सफल होतं. त्यामुळे तुम्हाला जीवनात सफल व्हायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल तर आळस झटकून घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवावं.

झोपताना आपले पाय न धुता झोपणाऱ्या व्यक्ती – मित्रांनो खूप जणांना सवय असते बाहेरून आलं की पायन धुता अंथरुणावर पडतात. अस्वच्छ पायाने झोपणं ही खुपच वाईट सवय आहे. अशा व्यक्तींच्या घरी रो ग रा ई वाढते, आ जार वाढतात. अशा व्यक्तींचा भरपूर पैसा हा आरो ग्यासाठी खर्च होतो.

हिंदू धर्म शास्त्र असं मानतं की पाय न धुता झोपणाऱ्या किंवा ओल्या पायाने झोपणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात आजा रपन वाढतात. त्यामुळे मित्रानो स्वछतेचा अंगीकार करा.

भारत सरकार ने सुद्धा स्वछते साठी खूप मोठे उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्या सर्व उपक्रमात सहभागी होऊन आपण सुद्धा स्वच्छतेचं महत्व जाणून घ्या. अनेक जण या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीत पण मित्रांनो आपण अनुभव घेऊन देखील याचा पडताळा करून घेऊ शकता.

डोक्याला लावलेलं तेल इतर अवयवांवर लावणारी व्यक्ती – मित्रांनो खूप जण डोक्याला तेल लावल्यानंतर उरलेलं तेल हे आपल्या हाताला, पायाला चोळतात. हिंदू धर्म शास्त्रानुसार अशा व्यक्तीच्या आयुष्यात माता लक्ष्मी चे स्थान कधीच निर्माण होत नाही. तेव्हा इथून पूढे तुम्ही सुद्धा तेल हातापायाला चोळत असाल तर ती गोष्ट टाळा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *