नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे.

कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते. स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे.
रोजच्या जगण्यात आपण कसेही जगतो. पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आणि काय चूक आहे या गोष्टी आपण ठरवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी समर्थांचे विचार आपल्याला प्रेरणा देणारे आणि सकारात्मक उर्जा देणारे ठरतात.

1. उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा

2. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे

3. जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा

4. विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी

5. जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो

6. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

7. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे

8. मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये –

9. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

10. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल – श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

11. खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते

12. तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही

13. कोणत्याही साकारात्मात विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.

14. प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये

15. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही – श्री स्वामी समर्थ

16. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका – स्वामी समर्थ

17. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठिशी आहे – श्री स्वामी समर्थ

18. मी आहे ना तुझ्या पाठिशी – स्वामी समर्थ

19. शुद्ध अंतःकरण ठेऊन नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते – स्वामी

20. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जाते .

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *