नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी भक्त हो नमस्कार,साधारणतः १८५६ मधील ही स्वामी लीला आहे. स्वामी महाराज टोळ यांनी स्वामींना स्नान घातले, पूजा केली आणि भोजनासाठी पात्र तयार केले. परंतु स्वामी महाराज भोजन करत नव्हते. सकाळचे दहा वाजून गेले. चिंतोपंत यांचा मुलगा विष्णुपंत हे सोलापूरच्या कलेक्टर च्या दफ्तर कचेरीत कारकून म्हणून कामाला होते. गोलटपेट साहेब हे कलेक्टर होते तर हनुमंत राव पितांबर हे दफ्तर दार होते.

दोन्हीही साहेब अतिशय कडक होते. सर्व कारकून यांनी दहा वाजता कचेरीत यावे असा कडक नियम होता. आणि म्हणून चिंतोपंतनी विष्णुपंत यांना दहा वाजले आहेत तुला कचेरीत जायचे आहे. म्हणून तू जेवण करून घे. असे सांगितले परंतु विष्णुपंत स्वामींचे अनन्य भक्त होते. इथे कचेरीत जे व्हायचे ते होईल. पण स्वामींनी जेवण केल्याशिवाय आपण पण जेवण करायचे नाही असा निश्चय त्यांनी केला.

आणि घरीच थांबून राहिले स्वामी महाराज हा सर्व प्रकार बघत होते. आणि जवळ जवळ अकरा वाजयाच्या सुमारास स्वामी महाराज जेवायला बसले. स्वामींनी भोजन केल्यानंतर विष्णुपंत यांनी सुद्धा भोजन उरकले. आणि दर्शन घेऊन घाईघाईने कचेरीत आले. स्वामी भक्त हो कचेरीत आल्यावर एक आश्चर्य घडले. ते असे की त्यावेळी बाळकृष्ण देवराव हे कलेक्टरचे हेड क्लार्क होते.

त्यांच्याकडे हजेरी भरण्याचे मेन काम होते. उशीर झाला म्हणून विष्णुपंत गोंधळलेले होते. आणि अंगावरील वस्त्र खाली ठेवून रथ बदली साठी ते हेड क्लार्क कडे आले. विष्णुपंत यांची विनंती ऐकून हेड क्लार्क बाळकृष्ण यांना आश्चर्य वाटले. आणि आश्चर्य ने स्वरात बोलले. अहो !! आज तर तुम्ही माझ्या आधी कचेरीत आलेले आहात. आणि हे बघा..!

माझ्या अगोदर तुम्ही तुमची हजेरी भरलेली आहे.स्वामी भक्त हो जेव्हा विष्णुपंत यांनी हजेरी बुक उघडून बघितली तेव्हा त्यात ते हजर असल्याची नोंद केली होती. स्वामींच्या या लिलेचे सर्वांना आश्चर्य वाटले. त्यांनी इतर मंडळींना सुद्धा हा स्वामींचा चमत्कार सांगितला. जो माझी अनन्य भक्ती करतो त्याचा योग क्षेम मी चालवतो. य या स्वामी वाणीचा अनुभव सर्वांना आला. आणि सर्वांनी एक जयघोषात स्वामी नामाचा जयजयकार केला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

आजच्या लिलेत स्वामी महाराज खूप छान प्रेरणा देत सांगत आहेत. की ज्या भक्ताने मला संपूर्ण समर्पण केलेले आहे. ज्याचे चित्त माझ्या ठिकाणी जडलेले आहे. जो प्रत्येक कर्म मला समर्पित भावनेने करतो आहे. अशा भक्ताच्या मी सदैव पाठीशी आहे.

अशा भक्ताच्या संपूर्ण जीवनाची जबाबदारी मी घेतलेली आहे. स्वामी भक्त हो जेव्हा आपण आपल्यातील अहांकरावर मात करून आपल्यातील मी बोलणाऱ्या मनावर मात करून स्वामी प्रेमाच्या भावनेत संकल्प समर्पित करतो.

आणि त्या दिशेने कर्म करतो. तेव्हा स्वामी महाराज आपल्या संपूर्ण जीवनाची जबाबदारी स्वीकारतात. आणि तेव्हा आपल्या शरीराद्वारे झालेला संकल्प हा ईश्वरीय संकल्प बनतो. आपल्या शरीराद्वारे केलेले कर्म हे ईश्वरीय कर्म असते. आणि त्यावेळी चमत्कारिक रित्या सृष्टीतील प्रत्येक अनुरेनु आपल्यासाठी काम करतात. आपल्याला यश निश्चितच मिळते.

बघा विष्णुपंत यांनी निश्चय केला की स्वामींनी भोजन घेतल्याशिवाय आपण भोजन करायचे नाही. खर तर वरवर दिसता आपल्याला ही गोष्ट साहजिक वाटत असेल परंतु विष्णुपंत यांचा निश्चय हा वरवरचा नव्हता. तर विष्णुपंत यांचा संकल्प अनन्य स्वामी प्रेमाने भरलेला होता. त्यांच्या संकल्पात स्वामी प्रेमाची शक्ती होती. म्हणूनच त्यांच्या बाबतीत हा चमत्कार झाला.

यासह हजेरी बुक वर सही करून तुझ्यासाठी सांसारिक जीवनात कलेक्टर कचेरीतील कारकुनाची नोकरी हे पात्र आणि यासाठीचे कर्म अटळ आहे. हे तुला चुकवता येणार नाही. हे कर्तव्य तुला करायचेच आहे. आणि मी स्वतः सही करून हजेरी लावली. हा सुद्धा गर्भित संकेत स्वामींनी विष्णुपंत यांना दिला. म्हणून स्वामी भक्त हो आजच्या स्वामी लीतून प्रेरणा घेता आपल्याला आपल्या जीवनातील ध्येय आपले पात्र उत्कृष्ट करण्याचा संकल्प करायचा आहे.

आणि आजच्या लीलेतून विष्णुपंत यांचा आदर्श समोर ठेवत दृढ निश्चय करत आपल्या संकल्पात पूर्ण स्वामी प्रेम ओतायचे आहे. स्वामी भक्ती स्वामी सेवा म्हणून प्रत्येक संकल्प करायचा आहे. मग तो कौटुंबिक असेल, आपल्या कामाच्या ठिकाणी असेल किंवा सामाजिक असेल आणि त्या दिशेने कार्य सुरू करायचे आहे.

बघा स्वामी प्रेमाच्या शक्तीने येणाऱ्या संभाव्य अडचणी चमत्कारिक रित्या परस्पर विलीन होऊन जातील. आणि आपण या स्वामी लिलेचा आनंद घेऊ. चला तर मग आज आपण स्वामीना प्रार्थना करुया.हे स्वामी माऊली!! मला इतकी तुमची भक्ती द्या की माझ्या शरीराच्या पेशी अन पेशी फक्त श्री स्वामी समर्थ बोलेल.

संपूर्ण शरीर स्वामीभक्त मय होऊ द्या. माझ्या शरीरा द्वारे होणारे प्रत्येक कर्म मग ते कौटुंबिक असो वा रोजोरोटीचे किंवा सामाजिक असो प्रत्येक कर्म तुमचीच सेवा असू द्या. आणि माझ्या शरीराला निमित्त करून फक्त तुम्हाला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यती करवून घ्या! हे स्वामिराया !! हे तुम्हीच करू शकतात कारण तुम्ही या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहात! तुम्हाला सर्व शक्य आहे.

म्हणाले अनंत कोटी विश्व वीर राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्तभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार !

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *