नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो आपल्याला कुटुंबावर किंवा आपल्यावर एखादं संकट येणार असेल तर त्याचा सर्वात आधी प्रभाव आपल्या घरातील तुळशीच्या झाडावर होतो. अशात आपण तुळस कितीही जपली तरी हळू-हळू ती वाळायला लागतं.तुळशीचे झाड आपल्यावर येणार्‍या संकटाचे संकेत देतं आणि शास्त्रांप्रमाणे ज्या घरात संकट येणार असतं त्या घरातून लक्ष्मी अर्थातच तुळस निघून जाते, कारण जिथेही दारीद्र, अशांती किंवा क्लेश असेल तिथे लक्ष्मी वास करत नसते. ज्योतिष्याप्रमाणे असे बुध ग्रहामुळे होतं. बुध याचा प्रभाव हिरव्या रंगावर होत असून याला वनस्पतीसाठी कारक ग्रह मानले आहे.

आणि मित्रांनो बुध ग्रह इतर ग्रहांचे चांगले आणि वाईट प्रभाव जातकांपर्यंत पोहचवयाचे काम करतो. त्यामुळे अशुभ फल मिळणार असेल तर झाड वाळायला लागतं तसेच शुभ फल मिळणार असेल तर झाडाची वाढ होते आणि ही वास्तू दोष दूर करते.तुळस आरोग्यासाठी खूप गुणकारी असून ही घरातील दोष दूर करून जीवन निरोगी आणि सुखी करण्यात सक्षम आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानकच सुकते, आपण कितीही काळजी घेतली तरी हे रोप सुकतच जाते.

तर हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्‍तीचा वास आहे. किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे.आणि त्याचबरोबर तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा ही होतो की कोणत्या तरी कारणाने आपले जास्त धन खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीच सुकू देऊ नका.तुळशीची हिरवी पाने आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश आणि वाटणी सारख्य़ा समस्या येऊ शकतात.घरातील आपसी संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. अस होत असल्यास, विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज संध्याकाळी तुळशी जवळ तुपाचा दिवा नक्की लावा.

तुळशीच्या शेजारी छोटे छोटे दुसरे रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात खुप आनंद येणार आहे, तुमचा व्यापार वाढणार आहे, तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो.तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी बद्दल संकेत देतात. आपण अस ही बघितले असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्‍ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे. कोणत्या तरी व्यक्‍तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.तुळशीच्या रोपावर छोटे फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धन लाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे.तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या दारामध्ये असणारी तुळस ही आपल्याला आपल्यावर येणाऱ्या चांगल्या किंवा वाईट वेळेचे संकेत देत असते आणि म्हणूनच मित्रांनो आपल्या दारामध्ये जे तुळस आहे तिची आपण दररोज व्यवस्थितपणे निगा राखली पाहिजे आणि त्याची काळजी ही आपल्याला घेतली पाहिजे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *