नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! स्वामी समर्थ महाराज आपल्या एका चरित्रामध्ये भक्तांना उद्देशून म्हणतात की उपवास कर किंवा नको करू तुझी मर्जी जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण मोहांवर मात्र नक्की विजय मिळव तू रोज मठात जा किंवा नको जाऊस तुझी इच्छा तिथे नमस्कार केला नाही तरी चालेल पण तुझ्या अहंकारावर मात्र नक्की विजय मिळव तु सोळव मान किंवा नको मानू तुझा हक्क आहे

तो ते सर्व मानलं नाही तरी चालेल पण तुझे आचार मात्र पवित्र ठेव तू रोज अकरा माळी जप कर किंवा नको करू स्वामी चरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचू तुझी निवड त्यासाठी वेळ नसला तरी चालेल पण आपल्या माणसांची मन जरूर वाच बघ तुला जमतय का? तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊ तुझी आवड त्यासाठी सवड नसली तरी चालेल पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पाहायला नक्की शिक

बघ तुला जमतय का स्वामी आपल्या भक्तांना संदेश देत म्हणतात की मी मंदिरात नाही माझ्या अभिषेकाला दूध आणू नका दूध घ्यायचे असेल तर वस्तीतल्या एका तान्हुल्याला द्या मी तुम्हाला तिथेच भेटेन तुम्ही मंदिरात मला भेटायला येऊ नका कारण मी मंदिरात नाही तुम्हाला मला नैवेद्य द्यायचा असेल तर जरूर या पण मंदिरात येऊ नका एखाद्या भुकेल्याला पोट भरून खायला घाला

मी तिथेच असेन तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला माझी सेवा करायची असेल तर जरूर करा मी रस्त्यांवर बसलेला रोग्यांमध्ये आहे मी तुम्हाला तिथेच भेटेन कारण मी मंदिरात नाही मला कुठलेही वस्त्र देऊ नका ते वस्त्र रस्त्यावर थंडीने कापत असलेल्या एका मुलाला द्या मी तिथेच भेटेल कारण मी कुठल्याही मंदिरात नाही दिव्यांचा झगमगाट नक्की करा पण मंदिरात नाही

अंधकारात जगत असलेल्या माझ्या अंध मुलांमध्ये त्याच्या आयुष्याला प्रकाश देऊन करा मी आहे तेथेच दुवा द्यायला कारण मी मंदिरात नाही मला भेटायला नक्की या पण पानं-फुलं घेऊन नका येऊ त्या प्राण्यांना एक पेंडी चारा देऊन या तेव्हा माझं दर्शन होईल तुम्हाला कारण मी मंदिरात नाही मला नमस्कार करायचा असेल तर नक्की करा मी तुमच्या कुटुंबाला मधल्या प्रत्येक वरिष्ठ व्यक्तीमध्ये आहे

त्या आई-वडिलांना नमस्कार करा मी तुम्हाला तिथेच भेटेन कारण मी मंदिरात नाही स्वामी समर्थ आपल्या भक्तांना वचन देतात की तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे जो माझी अनन्यभावाने भक्ती करतो त्याचा योगाक्ष मी स्वतः वाहातो आळशी माणसाचं तोंड पाहू नये शेत पिकवुन खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा जा तुझे अपराध मी माफ केलेत यापुढे सावधगिरीने वाग

भिऊ नकोस पुढे जा संकट दूर होईल काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालवा मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी मी इथे आलो आहे म्हणून आता निर्धास्त रहा हम गया नही जिंदा है स्वामींवर विश्वास आणि श्रद्धा ठेवा कारण संकट कितीही मोठं असलं तरी आपले स्वामी कायम आपल्या पाठीशी राहणार आहेत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *