नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! २६ मार्च २०२४ ला फाल्गुन मासातील कृष्ण पक्ष द्वितीया तिथी आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज, हस्त नक्षत्रात ध्रुव योग असणार आहे. या दिवशी दुपारी ११ वाजून ५५ मिनिटांपासून ते १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे तर राहू काळ दुपारी ३ वाजून २१ मिनिटांपासून ते ४ वाजून ५२ मिनिटांपर्यंत असणार आहे. आजच्या दिवशी चंद्र कन्या राशीत स्थिर असणार आहे. आजच्या दिवशीचे मेष ते मीन राशीच्या कुंडलीत कोणते बदल अपेक्षित आहेत याचा आढावा पाहूया.

मेष:-आवडते खेळ खेळाल. मुलांशी मन-मोकळ्या गप्पा माराल. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. झोपेची तक्रार जाणवेल. लहानांशी मैत्री कराल.

वृषभ:-कामातून चांगला लाभ मिळेल. तुमचा खिसा भरलेला राहील. घरातील वातावरण खेळते असेल. कल्पना शक्तीला चांगला वाव मिळेल. इतरांचे भर भरून कौतुक कराल.

मिथुन:-जवळच फिरण्याचा आनंद घ्याल. प्रेमाला अधिक बहर येईल. वात विकार वाढू शकतात. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. वेळेचे बंधन पाळावे लागेल.

कर्क:-घरगुती कामात दिवस जाईल. आपलेच म्हणणे खरे कराल. नवीन गोष्टीकडे ओढ वाढेल. मोहापासून दूर राहावे लागेल. कामात स्त्रियांची मदत होईल.

सिंह:-तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. आपली योग्यता दाखवून द्याल. वादाचे मुद्दे बाजूस सारावेत. पत्नीशी मतभेद संभवतो. मुलांची समस्या दूर करावी.

कन्या:-पचनाचा त्रास जाणवेल. गप्पांमधून मतभेद वाढू शकतात. धार्मिक स्थळांना भेट द्यावी. मनाची विशालता दाखवून द्याल. कलेला पोषक वातावरण मिळेल.

तूळ:-कमी श्रमात कामे करण्याकडे भर राहील. शेअर्स मध्ये पैसे गुंतवाल. सासुरवाडीचे लोक भेटतील. अचानक धनलाभ संभवतो. सांपत्तिक दर्जा सुधारेल.

वृश्चिक:-पत्नीचा लाडिक हट्ट पूर्ण कराल. कर्तव्याची जाणीव ठेवून वागाल. महिलांचा योग्य मान राखला जाईल. कामाचा विस्तार वाढवाल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.

धनू:-नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात. कौटुंबिक खर्चाचे नियोजन करावे लागेल. मत्सराला मनात थारा देऊ नका. स्वभावात उधळेपणा येईल. घरगुती कार्यक्रम आखले जातील.

मकर:-कामाचा वेग वाढेल. ठाम निश्चय केले पाहिजेत. पित्त विकार बळावू शकतात. अडचणींवर मात करता येईल. थोडीफार दगदग वाढू शकते.

कुंभ:-बौद्धिक चलाखी दाखवाल. समय सूचकता ठेवावी लागेल. फार हटवादीपणा करू नये. उत्सुकतेने गोष्टी जाणून घ्याल. अती चिकित्सा करू नका.

मीन:-सामाजिक दर्जा उंचावेल. मानाने कामे मिळवाल. तुमच्यातील उदारपणा दिसून येईल. स्वत:चे स्वत्व जपण्याचा प्रयत्न कराल. आत्मविश्वास वाढीस लागेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *