नमस्कार मित्रांनो.. Darjedar Marathi या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो मी व माझे सर्व कुटुंबीय श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असून आम्ही मनोभावाने स्वामींची सेवा करतो अर्थात आमच्याकडून परमपूज्य गुरुमाऊली साक्षात स्वामी रुपात राहून सेवा करून घेतात. सेवेकरी झाल्यापासून मला बरेच अनुभव आले परंतु त्यापैकी एक महत्त्वाचा अनुभव आपल्या पुढे मांडत आहे.

माझा मुलगा लहान असताना त्याला निमोनिया झाला व त्याच्या हृदयाला छिद्र होते. निमोनिया बरा करून हृदयाचे ऑपरेशन लगेच करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. निमोनियाची ट्रीटमेंट चालू असतानाच केंद्रातून सेवा घेतली व सेवा सुरू केली.

सेवने लवकरात लवकर त्याला आयसीयूच्या बाहेर काढले पण बिल भरायला आमच्याकडे पैसे नव्हते. माझ्या पतीला अवघा पंचवीसशे रुपये पगार होता दवाखान्याचा बिलाच्या पैशांची तरतूद करूनही पाच हजार रुपये कमी पडत असताना एका सेवाभावी संस्थेने ती मदत मुलाच्या नावे दवाखान्यात जमा केली.

मुलाला घरी आणल्यानंतर परमपूज्य गुरुमाऊलींकडे घेऊन गेलो त्यावेळेस दिंडोरीत पाऊस चालू होता माझी काही माऊली पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. माझे पती बाळाला घेऊन परमपूज्य गुरुमाऊलींकडे गेले व प्रश्न केला. त्यांना सेवा देऊन परमपूज्य गुरुमाऊलीने बाळाच्या डोक्यावर हात ठेवून नारळ देऊन सांगितले सेवा करा पैसे खर्च करू नका याला काहीही होणार नाही!’

मला मात्र बाळाचे हाल पाहवत नव्हते व आईला जसे मुलाच्या मनातील काही गोष्टींना सांगता कळता तसेच माझ्याबरोबर झाले. कारण सेवा करताना दिवस रात्र परमपूज्य गुरुमाऊलींना विनंती करायची की याचे ऑपरेशन व्हावे व तेही लवकरात लवकर ते विचाराने सैरभैर होऊन जायचे व तीन नोव्हेंबर 2009 रोजी एका संस्थेतर्फे एकही रुपयांना लागतात बाळाचे ऑपरेशन स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने व्यवस्थित पार पडले व तो आता ठीक आहे.

ऑपरेशन झाल्यानंतर एक वर्षांनी आम्ही बाळाला गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी घेऊन गेल्यावर माऊलीने त्यालाच चरण स्पर्श दिले व आमच्या हातात नारळ व त्यांचेच कृपा पंचवीसशे रुपये कमावणारे माझे मालक आज व्यवस्थित भागीदारी व्यवसाय करत आहेत ही सर्व परमपूज्य गुरुमाऊलींचेच कृपा होय.

तेव्हा आपल्याला आमच्यापेक्षा कदाचित जास्त दुःख असेल पण, आमच्या सारखे डगमगू नका विश्वास ठेवा, सेवा करा व मेवा खा. स्वामी महाराज कुठल्याही संकटातून त्यांच्या भक्तांना तारुण नेतात तेच दुःखात साथ देता फक्त निस्वार्थ भक्ती व सेवा करा असे अनेक सेवेकरी घडवा मअजून महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *